NC Times

NC Times

महसूलच्या साथीने शिव भोजन गरिबांच्या ताटावर संचालकांचा डल्ला


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख) 
गरीब व गरजू नागरिकांना भोजन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नाममात्र दराने शिव भोजन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आटपाडी शहरांमध्ये ७५ थाळीचे तीन शिवभोजन केंद्रे सुरू आहेत मात्र या शिवभोजन केंद्राचा सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी शिवभोजन केंद्र संचालक याचा फायदा उठवत असल्याचं चित्र मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे परंतु संचालकांच्या या बनवाबनवी मध्ये महसूल विभाग सुद्धा बरोबरीने सामील असल्याचं पाहायला मिळत आहे शिव भजन केंद्र मार्फत व्यवस्थित सेवा दिली जात आहे किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी पुरवठा विभागाकडे आहे पुरवठा विभागातील अधिकारी फक्त कागदोपत्री खानापूरती करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे 
आटपाडी बस स्थानक उपहारगृहामध्ये मानसी महिला बचत गटमार्फत शिवभजन केंद्र चालवले जात आहे सदरचे केंद्र 31 मार्च 2020 पासून सुरू आहे परंतु हे केंद्र इथे सुरू आहे हे दर्शवणारा फलक कोठेही दिसत नाही शिवाय उपहारगृहामध्ये सुद्धा कोठेही सूचनाफलक पाहायला मिळत नाही या केंद्रामध्ये फक्त उपारगृहामध्ये आलेल्या नागरिकांचे फोटो काढून शासकीय अनुदान मिळवण्याचे काम सुरू आहे दुसरं शिवभोजन केंद्र सिद्धनाथ चित्रमंदिर समोर राधिका डायनिंग हॉल मध्ये सुरू आहे या शिवभोजन  मालक आहेत लता अशोक माळी सदरचे केंद्र तीन एप्रिल 2020 पासून सुरू आहे याही ठिकाणी जो शिवभोजनाचा फलक जिथे सुरू आहे तिथे लावने आवश्यक होते मात्र सदरचा बोर्ड हा पायऱ्यांच्या बाजूला अशा दिशेने लावलेला आहे की तो सहसा कोणाच्या नजरेस पडू नये व या ठिकाणी कोणी हुडकत हुडकत जरी गेला तरी जेव्हा कोणी तिथे पोहोचेल तेव्हा ताटाची मर्यादा संपलेली आहे असं सांगून ग्राहकाला परत पाठवले जातेतिसरं शिवभोजन केंद्र ग्रामीण रुग्णालयासमोर ओमरत्न स्नॅक्स सेंटर मध्ये उत्तम नामदेव बालटे हे चालवत आहेत सदरचे केंद्र 15 एप्रिल 2020 पासून सुरू आहे मात्र या ठिकाणी सुद्धा शिवभोजनाचा लावलेला बोर्ड अगदी अडगळीच्या ठिकाणी आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी शिव भोजन येथे उपलब्ध आहे असा कोणताही फलक दिसत नाही शिवाय येथील हॉटेल संचालकांना शिवभोजनाविषयी विचारणा केली तर ताटाची मर्यादा संपलेली आहे असंच उत्तर मिळतं





सदरची शिवभोजन केंद्रे जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हापासूनचा हा भोंगळ कारभार सुरू आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कृषी सेलचे तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी 15 जानेवारी रोजी आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांची भेट घेऊन सदर केंद्रांच्या भोंगळ कारभाराबाबत तक्रार केली होती सदर बाबतीत तहसीलदार सागर ढवळे यांनी तीन दिवसांमध्ये कारवाई करतो असे ठोस आश्वासन दिले होते मात्र दोन आठवडे उलटून सुद्धा महसूल विभागातील साधा कारकून या केंद्राकडे फिरकला नाही तेव्हा प्रकाश गायकवाड यांनी सोमवार 29 जानेवारी रोजी स्वतः हजर राहून शिवभोजन केंद्राच्या भोंगळ कारभाराचा पंचनामा करण्यासाठी आग्रह केला मात्र अद्याप महसूल विभागाकडून शिवभोजन केंद्र संचालकांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे यामध्ये महसूल विभाग आणि केंद्र संचालक यांच्यामध्ये काहीतरी हितसंबंध जोपासले जात आहेत हे मात्र नक्की