NC Times

NC Times

रविवारी आटपाडी येथे सर्व धर्मीय वधु-वर परिचय महामेळावा


नवचैतन्य टाईम्स 
घाटनांद्रे/वार्ताहर :-(जालिंदसात जन्माच्या गाठी विवाह संस्था तासगाव-कवठेमहंकाळ यांच्या वतीने रविवार दिनांक २८ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत श्री मंगल कार्यालय बनपुरी फाटा - भिंगेवाडी (आटपाडी) येथे सर्वधर्मीय वधु-वर परीचय महा मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती सागर पाटील (वायफळेकर) यांनी कवठेमहांकाळ येथे दिली असून,गरजूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. 
     यावेळी बोलताना सागर पाटील पुढे म्हणाले की सकाळी दहा वाजता सेवानिवृत्त मुख्याध्यापक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर वैद्य (गुरुजी) यांच्या हस्ते व जेष्ठ नागरिक संघटनेचे विलास भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर मेळाव्याचे उदघाटन होणार आहे. तरी गरजूंनी सदर मेळाव्यास अगदी वेळेत उपस्थित रहाण्याचे आवाहन केले असुन,इच्छुकांनी येताना सोबत बायोडाटा व फोटो आणण्यासही त्यांनी यावेळी सांगितले आहे.तसेच अधिक माहितीसाठी ९५११६२७१६० या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.