NC Times

NC Times

शिक्षक नेत्याच्या नेतागिरीची होणार चौकशी; त्री सदस्य समितीला दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

 नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी (राजु शेख)

आटपाडी तालुक्यातील लिंगे वस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये नियुक्त असलेले सहशिक्षक उत्तम तायाप्पा जाधव यांची महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभागाने दिले आहेत

उत्तम जाधव हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंगे वस्ती येथे सहशिक्षक म्हणून नियुक्त आहेत मात्र ते मागील दहा वर्षापासून शिक्षक नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण करत आहेत हे करत असताना ते अनेक वेळा राजकीय नेते मंडळींच्या आसपास व राजकीय व्यासपीठावर पाहायला मिळतात असाच एक प्रसंग 6 जानेवारी रोजी ओबीसी मेळावा पंढरपूर येथे मंचावरून भाषण करत असतानाची चित्रफीत समाज माध्यमावरती फिरत होती याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये 15 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आले होते या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांनी सदर घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामध्ये त्रिस्तरीय समिती स्थापन केली आहे यामध्ये तासगावचे गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड खानापूर पंचायत समिती येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी विकास राजे व सांगली जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी रंगराव आठवले यांच्या समितीला सदर घटनेची चौकशी करून सेवा वर्तणूक नियम व शिस्त आणि अपील यातील तरतुदीनुसार नियमोचित शिस्तभंग विषयक प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करणे कामी सत्यता पडताळणी करून दोन दिवसात तातडीने अहवाल सादर करावा असा आदेश पारित करण्यात आला आहे