NC Times

NC Times

जि.प.शाळा धावडवाडी ता.आटपाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)  दि. २६/०१/२०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा धावडवाडी ता.आटपाडी जि.सांगली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला सर्व प्रथम ध्वजारोहण मा. बाबा साहेब शेख यांच्या हस्ते झाले तदनंतर प्रभात फेरी काढण्यात आली व कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत चे सरपंच मा. युनूस शेख अध्यक्ष म्हणून लाभले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत सदस्य मा. दिलावर शेख ,नुर महम्मद शेख , जुबिदा शेख, रशिदा शेख डॉ. असलम अल्ली भाई शेख,. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. बाबूलाल शेख तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी शिक्षक हजर होते





सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व प्रथम स्वतंत्र लढ्यातील शहिदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली
सर्व प्रथम विद्यार्थ्यांचे भाषण झाले त्यानंतर मुलांनी जैसी करणी वैसी भरणी ही नाटिका सादर केले तसेच मुलांनी आणि मुलींनी नृत्य सादर केले
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे 🙏🏻