NC Times

NC Times

आजपासून घाटनांद्रेत श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेस प्रारंभ


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर:-(जालिंदर शिंदे
) आजपासुन घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेस प्रारंभ होत असून यानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक,सांस्कृतिक व निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन केले आहे. 
      आज शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी देवीची बोणी व नैवेद्य असुन सदर दिवशी मंदिर परिसरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.तर सायंकाळी ६ ते १० यावेळेत मास्टर जयसिंग पाचेगावकरसह नृत्यतारका लता-लंका पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.तर शनिवार दिनांक २७ जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असुन सदर दिवशी १० ते ३ यावेळेत तमाशाचा कार्यक्रम तर सकाळी १० वाजल्यापासूनच खाड्यांच्या मेटापासुन श्रीच्या पालखी मिरवणूकीला सुरवात होणार आहे.सदर पालखी मिरवणूक घरोघरी फिरून दुपारी चार नंतर किचासाठी किचाच्या माळावर जाणार आहे.तेथे किचाचा कार्यक्रम होऊन यात्रा संपणार आहे. 
       तदपुर्वी दुपारी तीन नंतर खासदार संजय (काका) पाटील,महाराष्ट्राचे युवा नेते रोहीत   (दादा) पाटील व डब्बल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य असे निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदाना होणार आहे.यामध्ये अनेक लहानमोठ्या चटकदार कुस्त्यां होणार आहेत.सदर कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची ५१ हजार इनामासाठीची लढत ही पै सागर चौगुले (जुनोनी ता सांगोला) विरुद्ध पै परमेश्वर गाडे (बामणी तालीम) यांच्यात होणार आहे.तर द्वितीय क्रमांकाची ३१ हजार रुपये बक्षीसाची कुस्ती ही पै बबलू सुतार (बेणापूर) विरुद्ध पै विशाल शेळके (वसंतदादा कारखाना सांगली) त्याचबरोबर तृतीय क्रमांकासाठीची २१ हजार इनामासाठीची लढत ही पै सुशांत शेजुळ (कुंभारी तालीम) विरुद्ध पै कुमार पाटील (वसंतदादा कारखाना सांगली) यांच्यात होणार आहे.तसेच यात्रेनिमित्तच रविवार दिनांक २८ रोजी सायंकाळी ७ वाजता जल्लोष ऑर्केस्ट्याचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. 
        यात्रेनिमित्तने मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली असून,यात्रेकरुसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन,ग्रामस्वच्छताही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.