NC Times

NC Times

कराड तालुक्यातील कळंत्रेवाडी येथील म्हसोबा लक्ष्मी ग्रामदैवतांच्या मंदिरात घुमला राम नामाचा गजर


नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(दिनेश लोंढे)
हिंदूंचे आराध्य दैवत,प्रेरणास्थान प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा आज सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी आयोध्या येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील कळंत्रेवाडी येथे म्हसोबा लक्ष्मी ग्रामदैवतांच्या मंदिरात येथील नागरिकांनी मोठ्या भक्ती भावाने एकत्र येत राम नामाचा गजर केला. दरम्यान,यावेळी संपूर्ण वातावरण प्रभू रामचंद्रांच्या भक्तीरसात बुडून गेल्याचे  चित्र पहावयास मिळाले.नागरिकांनी भल्या सकाळीच आपापल्या दारात सडा- रांगोळी काढून,गुढ्या उभ्या करून राममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याची शोभा वाढवली.दरम्यान, सकाळी सात वाजता मारुती मंदिरात आरती व पूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अकरा वाजता म्हसोबा-लक्ष्मी ग्रामदैवतांच्या मंदिरात महिलांनी लक्ष्मी देवी मूर्तीला अभिषेक,आंघोळ व वस्त्रालंकार घातल्यानंतर आरती व राम रक्षा स्तोत्राचे पठण करण्यात आले. दरम्यान,यावेळी भगवी टोपी,भगवे उपरणेधारी नागरिकांनी "जय श्रीराम" च्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून सोडला.त्यानंतर जिलेबीच्या प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी साक्षात प्रभू रामचंद्र अवतरल्याचा भास झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.