NC Times

NC Times

धावडवाडीचे लोकप्रिय सरपंच इनुस शेख यांच्या प्रयत्नांतुन मोदी आवास योजनेस प्रारंभ




नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)  धावडवाडी गावामध्ये सरपंच इनुस शेख यांच्या प्रयत्नातुन मोदी आवास योजनेतुन  ओबीसी प्रवर्गातून  तीन घरे मंजूर झाले आहे व दोन जनावरांचे गोटे व तीन कडबा कुट्टी मशीन मंजूर झाले असुन त्या कामाचे त्या तिन्ही कामास प्रारंभ  करण्यात आले यावेळी सरपंच इनुस शेख व सदस्य दिलावर शेख जुबेदा शेख नूर महम्मद शेख हे सदस्य व ग्रामसेवक उपस्थित होते.सन २०१६ पासून घरकूल धावडवाडी गावामध्ये एकही मिळाले नव्हते.ते आज २०२४ मध्ये मोदी आवास योजनेअंतर्गत तीन घरे मंजुर झाले आहेत.सरपंच यांच्या प्रयत्नातुन  घरकूल मंजूर  झाले असुन लाभार्थी गुलाब शाहिद हनीफ शेख करीम याकूब शेख वली इब्राहिम शेख या तिघांना ओबीशी प्रवर्गातून मोदी आवास योजनेचा लाभ देण्यात आली आहे व जनावरांचा गोठा मोहम्मद हुसेन शेख अब्बास अली कोंडुलाल शेख व कडबा कुट्टी ताहेर सुभान शेख मोहम्मद हुसेन शेख हसमुध्दीन आमुध्दीन शेख या लाभार्थीना मंजूर झाले असून त्या बद्धल सरपंचाचे आभार सर्व लाभार्थी व ग्रामस्थाकडुन करण्यात आले आहे.