NC Times

NC Times

महामुंबई "पासून अटल सेतू मार्गे मुंबई फक्त २० मिनिटांत

 

"महामुंबई" पासून अटल सेतू मार्गे मुंबई फक्त २० मिनिटांत

नवचैतन्य टाईम्स - मुंबई | दि. २४ /१/२०२४ 

उरण; मुंबई आणि "महामुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावा-शेवा चिरले ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचे नुकतेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या हस्ते लोकार्पण झाले. या सागरी अटल सेतूने व्यापाऱ्याच्यादृष्टीने महत्त्वाची अशी दोन शहरे अवघ्या २० मिनिटांमध्ये गाठता येणार आहेत. त्यामुळे माल वाहतूकदारांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) गाठणे सोप्पे झाले असल्याने हा सागरी सेतू उपयुक्त ठरणार आहे

 टोलचा झोल संपला
टोलच्या रांगेतून सुटका तळोजा, पाताळगंगा औद्योगिक वसाहत, खोपोली, पनवेल, पुणे व   संपूर्ण महाराष्ट्रातून  ठिकाणाहून मुंबई पोर्ट ट्रस्ट व उर्वरित मुंबईत मोठ्या प्रमाणात माल वाहतूक व प्रवासी दळणवळण होत असते. मुंबई जाण्यासाठी वाहनांना सायन-पनवेल मार्गाचा उपयोग होतो. परंतु, खारघर टोल नाक्यावर ट्रेलर ४०० तर ट्रकसाठी १९० तर वाशी टोल नाक्यासाठी १९०, ट्रक १३० जवळपास एवढ्याच पैशात अटल सेतूवरून सुसाट जाता येणार आहे.

‘अटल सेतू’ हा देशातील सर्वात लांब असा सागरी मार्ग आहे. या मार्गामुळे मुंबई ते महामुंबई (जी तिसरी मुंबई होऊ पहात आहे) हा प्रवास काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. तसेच पुणे- मुंबई,- गोवा, मुंबई,  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना ही जोडला जाणार आहे. एकंदरीतच राज्याच्या विकासात माल वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ‘अटल सेतू’ ची महत्त्वाची भूमिका महत्वाची व फायद्याची असणार आहे. या सेतूमुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ही देशातील अति महत्त्वाची बंदरे जोडली गेली आहेत. या दोन बंदरातून दररोज हजारो कंटेनर गाड्यांद्वारे मालाची वाहतूक होत असते. 

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये उतरलेला माल हा न्हावा-शेवा बंदर किंवा परिसरातील कंटेनर यार्डामध्ये किंवा गोदामात साठवला जातो. तेथूनच हा माल वितरीत केला जातो. तर जेएनपीटी बंदरातून मोठ्याप्रमाणात मुंबई पोर्ट ट्रस्ट तसेच उर्वरित महाराष्ट्र व संपूर्ण देशात माल पोहोचवला जातो. यासाठी वाशी खाडीपूल मार्गे वाहतूक केली जात असल्याने प्रक्रियेला किमान दोन दोन दिवस लागत होते. परंतु, अटल सेतूमुळे नवी मुंबई, मुंबईपर्यंतचा मोठा वळसा, वेळ , डिझेल,वाचणार आहे.

बांधकाम व्यवसायाला फायदा

नवी मुंबई तसेच सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी तसेच मुंबईत काही ठिकाणच्या अवजड वाहन बंदीतून काही प्रमाणात माल वाहतूकदारांची सुटका होणार आहे. या पुलाचा वापर केल्यास वाहतूक कोंडी, ट्रॅफिक सिग्नल व रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे माल वाहतुकीस एकावेळी जवळपास २० किलोमीटरच्या अंतरामुळे ९०० ते एक हजाराचे इंधन वाचणार आहे.

मुंबई व  चिरले परिसरातील 26 गावांमध्ये  डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात सुरू असलेली विकासकामे व बांधकाम व्यवसाय हा नवी मुंबई परिसरातील माल व साधन संपत्तीवर अवलंबून आहे. न्हावा-शेवा, कळंबोली, तळोजामधून मोठ्या प्रमाणात लोखंडी सळ्या, लोखंड-पोलाद, सिमेंट, खडी, दगड, विटा व इंडस्ट्रिअल साहित्याची वाहतूक अटल सेतू मार्गे कमीत कमी वेळात होणार आहे.